Snakes In Flood : पुराच्या पाण्यातून रस्त्यावर आले सापच साप, लोकांमध्ये दहशत; पहा व्हिडिओ - पुराच्या पाण्यातून विषारी साप
लक्सर, उत्तराखंड - उत्तराखंडमध्ये सतत सुरू असलेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. आता त्या पाण्यातून विषारी साप बाहेर येऊ लागले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक दहशतीत जीवन जगत आहेत. उत्तराखंडच्या लक्सरमधील मुख्य बाजारपेठेत साचलेल्या पाण्यातून अनेक विषारी साप बाहेर आले आहेत. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी नुकतेच सर्वेक्षणासाठी हरिद्वारला पोहोचले होते. त्यावेळी अनेक साप माणसांनी मारले होते. दुसरीकडे, आज पुन्हा लक्सरच्या सेंट कॉलनीतून साप बाहेर आल्याने कॉलनीतील रहिवासी दहशतीत आहेत. माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळ गाठून सापांना पकडून नेले. एकीकडे पावसाचा कहर सुरू असताना आता गल्लोगल्ली साप निघत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पहा हा व्हिडिओ..