UP News : इंजिनला लटकलेला मृतदेह घेऊन रुळावर धावत राहिली रेल्वे , दृश्य पाहून सर्वच हादरले - सौरव कुमार
Published : Nov 14, 2023, 7:16 AM IST
फिरोजाबाद (उत्तर प्रदेश) UP News : फिरोजाबादजिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. येथे फर्रुखाबाद-शिकोहाबाद पॅसेंजर ट्रेनच्या इंजिनला एका तरुणाचा मृतदेह लटकला होता. तशाच स्थितीत रेल्वे धावतच होती. कित्येक किलोमीटरचा प्रवास केल्यावर ट्रॅकच्या बाजूला उभ्या असलेल्या काही लोकांच्या नजरेस तो मृतदेह पडला. ते पाहून लोकांनी आरडाओरडा सुरू केला. ही बाब लक्षात येताच रेल्वेच्या लोको पायलटने थोड्या अंतरावर रेल्वे थांबवली. त्यानंतर मृतदेह खाली उतरवून या घटनेची माहिती शिकोहाबाद येथील स्थानिक अधीक्षकांना देण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार सौरव कुमार (वय 26) असं मृत तरुणाचं नाव आहे. तरुणाचा मृतदेह इंजिनला कसा लटकला हे कोणालाच माहीत नाही. सध्या पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. या संदर्भात शिकोहाबाद स्टेशनचे अधीक्षक राजेश्वर सिंह सांगतात की, 1220 किलोमीटरवर फर्रुखाबाद पॅसेंजरच्या कर्मचाऱ्यांकडून इंजिनला एक मृतदेह लटकत असल्याची माहिती मिळाली. ही माहिती लगेच पोलिसांना देण्यात आली. या घटनेमुळं रेल्वे 20 मिनिटं थांबली होती.