UP News : दे धक्का.. युपीच्या अर्थमंत्र्यांची कार खड्ड्यात अडकली...नागरिक मदतीला आले धावून! - UP News
लखनौ : रस्त्यातील खड्ड्यांची समस्या ही देशातील सर्वच राज्यात आहे. याच समस्येमुळे उत्तर प्रदेश सरकारचे अर्थमंत्री सुरेश खन्ना यांची चांगलीच फजिती झाली. त्यांची कार शाहजहांपूरमध्ये खड्ड्यात अडकली. यानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी अर्थमंत्र्यांच्या कारला धक्का दिला. रस्त्यावर मोठ्या खड्ड्यात गाडी अडकल्याने मंत्रीही संतापले. पण, सरकारही त्यांचे आहे म्हणून त्यांना कोणाला काही बोलता आले नाही. मात्र, रस्त्यावरून जाणाऱ्यांच्या मदतीने कार खड्ड्यातून बाहेर आल्यावर ते कोणालाही काहीही न बोलता निघून गेले.
उत्तर प्रदेश सरकारचे कॅबिनेट मंत्री सुरेश कुमार खन्ना शाहजहानपूरच्या दौऱ्यावर आले आहेत. एका कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी जात असताना अर्थमंत्र्यांची कार अचानक खड्ड्यात अडकली. रस्त्यावरील खड्ड्यात कार अडकल्यानंतर अर्थमंत्री कारमधून संतापाने खाली उतरले. यानंतर तेथून जाणाऱ्या नागरिकांनी कॅबिनेट मंत्र्यांच्या कारला धक्का दिला. काही प्रयत्नांनंतर त्यांची कार खड्ड्यातून बाहेर आली. त्यानंतर कॅबिनेट मंत्री तेथून त्यांच्या कारमध्ये बसून निघून गेले.