Buldana Marriage : गुरांना ढेप, मुंग्यांना साखर आणि 10 हजार लोकांना जेवणाचा बेत; शेतकऱ्याच्या मुलीच्या लग्नाची सर्वत्र चर्चा! - unique wedding in Buldana
बुलढाणा जिल्ह्यात एका शेतकऱ्याच्या मुलीचा अनोखा विवाहसोहळा पार पडला. लग्नासाठी 4 एकर परिसरात मंडप टाकण्यात आला होता. यावेळी गावातील तब्बल 10 हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था करत, गावातील गुरांसाठी कुटार, ढेप, कुत्र्यांसाठी पोळ्या तर मुंग्यांसाठी साखरेचा बेत ठेवण्यात आला होता. त्यामुळे या लग्नाची आता जिल्हाभर चर्चा होते आहे. या विवाहात माणसांसह मुक्या प्राण्यांचीही काळजी घेण्यात आली. सर्वप्रथम गायीचे पूजन करून परिसरातील सर्व गायींना ढेप खाऊ घालण्यात आली. त्यानंतर इतर गुरांना चारा, परिसरातील पक्ष्यांना तांदूळ तर श्वानांना जेवण देण्यात आले. विवाहात मुंग्यांही उपाशी राहू नये म्हणून दोन क्विंटल साखर परिसरातील मुंग्यांना टाकण्यात आली होती. शिवाय परिसरातल्या पाच गावातील जवळपास 10 हजार नागरिकांना विवाहाचे व जेवणाचे आमंत्रण देण्यात आले होते.