Union State Minister Reaction on Rana House Attack : शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर झाली तशी कारवाई व्हावी - केंद्रीय अर्थ राज्यमंत्री - Union State Minister Reaction on Rana House Attack
औरंगाबाद - खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) यांनी आपल्या अमरावती येथील घरावर हल्ला झाल्याचा आरोप केला आहे. यावर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड ( Union State Minister Bhagwat Karad ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ज्या पद्धतीने शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर कारवाई झाली. त्या पद्धतीने राणा यांच्या घरावर हल्ला करणाऱ्यांची चौकशी व्हावी व दोषींवर कारवाई व्हावी. दरम्यान, या आरोपाचे खंडण करत स्वतः गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Home Minister Dilip Walse Patil ) म्हणाले, मी तेथील पोलीस अधिकाऱ्यांकडे चौकशी केली. त्यांच्या म्हणण्यानुसार अमरावती येथील राणा यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमले असून घोषणाबाजी करत आहेत. पण, दगडफेक किंवा हल्ला, अशी कोणतीही घटना झाली नसल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले आहे, अशी माहिती वळसे पाटील यांनी दिली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST