मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे; रामदास आठवले यांचं सूचक विधान - ओबीसीना आरक्षण
Published : Nov 30, 2023, 9:23 PM IST
पालघर Ramdas Athawale Reaction: राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आक्रमाक झाले आहेत. ते राज्यभर दौरा करून काही नेत्यांवर टीकाही करत आहेत. मराठा समाजावर आणि ओबीसी समाजावर अन्याय होऊ नये, ही भूमिका शासनानी घ्यावी. तसेच मराठा समाजाला आरक्षण देताना टिकनारे आरक्षण द्यावं, असं सूचक विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) केलं आहे. पालघर येथील विराथन खुर्द या ठिकाणी 'विकसित भारत संकल्प यात्रा' या कार्यक्रमात त्यांनी हे सूचक विधान केलं आहे. मराठा समाजातील ज्या लोकांचे उतपन्न आठ लाखापेक्षा कमी आहे, त्यानाच आरक्षण दिलं पाहिजे. तसेच ओबीसीना आरक्षण देताना देखील अशीच अट आहे. त्यामुळं कोणावरही अन्याय होऊ नये अशी माझ्या पक्षाची भूमिका आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात हा निर्णय राज्यशासनाने घ्यावा, असं सूचक विधान करत आठवले यांनी याबाबत मागणी केलीय.