जेव्हा केंद्रीय मंत्री बंद पडलेल्या बसला देतात धक्का, पहा व्हिडिओ - अनुराग ठाकूर हिमाचल प्रदेश प्रचार
हिमाचल प्रदेशमधील केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर Union Minister Anurag Thakur यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ते सध्या राज्यातील विविध भागात जाऊन पक्षाची मते मागत आहेत. हिमाचलच्या बिलासपूरच्या महामार्गावर एक बस जेव्हा बंद पडली. तेव्हा मोठी वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा ताफाही या कोंडीमध्ये अडकला होता. मग काय स्वत: अनुराग ठाकूर गाडीत उतरले आणि त्यांनी गाडीला धक्का देऊन गाडी बाजुला करण्याचा प्रयत्न केला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST