Bridge Collapsed : गंगा नदीवरील निर्माणाधीन पूल कोसळला; पाहा भयावह व्हिडिओ - गंगा नदीवरील पूल कोसळला
भागलपूर (बिहार) : बिहारमधील भागलपूरमध्ये निर्माणाधीन पूल कोसळला आहे. सुलतानगंज-अगुवानी दरम्यान गंगा नदीवर बांधण्यात येत असलेल्या पुलाचे चार खांब गंगेत बुडाले आहेत. त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यापूर्वीही हा पूल कोसळला असून, त्याची चौकशी सुरू आहे. दुसरीकडे, रविवारी पूल कोसळल्याने बांधकामाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहेत. सुमारे शंभर मीटरपर्यंत हा पूल खचला आहे. मात्र, या घटनेत जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही.
अधिकाऱ्यांमध्ये खळबळ : घटनेची माहिती मिळताच अधिकाऱ्यांमध्ये खळबळ पसरली आहे. बिहार स्टेट ब्रिज कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनचे कार्यकारी अभियंता घटनास्थळी रवाना झाले आहेत. पुलाचे काही स्पॅन पडले असल्याचे त्यांनी सांगितले. हे घटनास्थळी पोहोचल्यानंतरच कळेल. आता काही बोलणे योग्य नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.