महाराष्ट्र

maharashtra

ज्येष्ठ घटनातज्ज्ञ उल्हास बापट

ETV Bharat / videos

Ulhas Bapat On NCP Political Crisis : राष्ट्रवादी कुणाची? नेमकं काय म्हणाले उल्हास बापट? वाचा सविस्तर

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 9, 2023, 2:00 PM IST

पुणे Ulhas Bapat On NCP Political Crisis :राष्ट्रवादीच्या पक्ष, चिन्हाबाबत आज निवडणूक आयोगात सुनावणी पार पडणार आहे. तसंच आज सर्वोच्च न्यायालयात शरद पवार गटानं दाखल केलेल्या आमदारांच्या अपात्रता याचिकेवरही सुनावणी होणार आहे. दरम्यान, या प्रकरणावर आता ज्येष्ठ घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांंनी आपलं परखड मत व्यक्त केलंय. शिवसेनेच्याबाबतीत सुप्रीम कोर्टानं तीन बाबी नमूद केलेल्या आहेत.  ते पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय शिवसेनेसारखाच लागेल असं नव्हे,  तर नवीन तत्वावर निकाल लागणार असल्याचं मत बापट यांनी व्यक्त केलंय. तसंच लोकशाहीमध्ये राजकीय व्यक्तींना खूप महत्त्व आहे. सुप्रीम कोर्टानं एक गोष्ट स्पष्ट करायला पाहिजे होती, असं माझं वैयक्तिक मत आहे. दोन तृतीयांश लोक हे एकाचवेळी बाहेर जायला पाहिजे. दोन-दोन, तीन-तीन, सहा महिन्यात गेले तर चालणार नाही. हे जर गृहीत धरलं तर शिवसेनेचे 16 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 अपात्र होतात. पण सुप्रीम कोर्टानं तसा निर्णय दिलेला नाही. पाहा उल्हास बापट यांची ही खास मुलाखत...

ABOUT THE AUTHOR

...view details