Ujjain Road Accident : रस्त्याच्या मधोमध असलेल्या सीवरेज चेंबरला दुचाकीस्वार धडकला, पहा अपघाताचे धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज - उज्जैनमध्ये अपघात
🎬 Watch Now: Feature Video
मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये रस्त्यावरील सिवरेज लाईनमुळे एका तरुणाला जीव गमवावा लागला. शहरातील सिवरेज लाईनच्या हाय चेंबरला धडकून झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा बळी गेला. तरुणाला गंभीर अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तेथे त्याचा मृत्यू झाला. या अपघाताचे हृदय पिळवटून टाकणारे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या आधीही अशाच प्रकारे सिवरेज लाईन पडून एका तरुणाचा मृत्यू झाला होता. शहरात गेल्या अनेक वर्षांपासून सीवरेज लाइन टाकण्याचे काम सुरू आहे. अनेक भागात कामे पूर्ण झाली आहेत, अनेक ठिकाणी काम बाकी आहे. सीवरेज लाईन टाकून रस्त्याच्या मधोमध हे चेंबर्स करण्यात आले आहेत, मात्र चेंबरचे झाकण रस्त्यापेक्षा 1 ते 2 फूट उंच करण्यात आले आहे. निष्काळजीपणामुळे पादचाऱ्यांचे अपघात होतात.