kirit Somaiya : किरीट सोमैयांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन; ठाकरे शिवसेना महिला आघाडी आक्रमक - women of the udhav thackeray
नाशिक : भाजप नेते किरीट सोमैया यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर आर्थिक संपत्तीच्या घोटाळ्याचा आरोप करणारे किरीट सोमैया यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. याप्रसंगी नाशिकमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी शालीमार चौकात शिवसेना महिला आघाडी आक्रमक झाल्याचे दिसून आले. यावेळी किरीट सोमैया यांच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन करण्यात आले. किरीट सोमैया यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी देखील करण्यात आली. गृहखात्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी तसेच सोमैया यांनी किती महिलांची फसवणूक केली आहे, याबाबत सत्यता पडताळावी अशी मागणी, ठाकरे शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केली.