महाराष्ट्र

maharashtra

Vajramooth Sabha

ETV Bharat / videos

Uddhav Thackeray : राम मंदिराच्या श्रेयासाठी टिकोजीरावांनी काढला फना, वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरेंचा मोंदींवर हल्लाबोल - Criticism Narendra Modi

By

Published : Apr 16, 2023, 10:57 PM IST

नागपुर :  महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजप, शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. तसेच हिदुत्वाच्या मुद्यावरुन त्यांनी राष्ट्रीय स्वसेवक संघाचे संघप्रमुख मोहन भागत यांच्यावर प्रहार केला आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी पंतप्रधांन नरेंद्र मोदींसह भाजपवर टीका केली आहे. मी मुख्यमंत्री असताना अयोध्येला गेलो होतो. तेव्हा राममंदिराचा प्रश्न उच्च न्यायालयात प्रलंबित होता. त्यावेळी मी राम मंदिरासाठी कायदा तयार करावा, अशी मागणी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली होती. मात्र, त्यावेळी मोदी सरकारने कोणतीही भूमिका घेतली नाही. राम मंदिराच्या प्रश्नावर त्यांनी त्यावेळी मैन बाळगले होते. ज्यावेळी राम मंदिराबाबत सुप्रीम कोर्टाने निर्णय आला त्यावेळी टिकोजीराव श्रेयासाठी फना काढला अशी टीका त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला आहे.  

ABOUT THE AUTHOR

...view details