VIDEO उद्धव ठाकरे बुलढाण्यातील चिखली दौऱ्यावर, शेतकऱ्यांशी साधणार संवाद - उद्धव ठाकरे शेतकऱअयांशी साधणार संवाद
बुलढाणा आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांचा बुलढाण्यातील चिखली Uddhav Thackeray melawa in Buldhana येथे दुपारी 3.00 वाजता शेतकरी मेळावा आणि जाहीर सभा आहे. सत्तांतरानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात येत Uddhav Thackeray meet Chikhli farmers आहेत. त्यामुळे निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. विदर्भात शिवसेनेचा सर्वात मोठा गड म्हणून बुलढाणा जिल्हा ओळखला जातो. मात्र याच जिल्ह्यातील दोन आमदार तसेच खासदार प्रतापराव जाधव यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने आता याठिकाणी उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार आहेत. याकडे सर्वांच लक्ष लागून आहे. सभेच्या पूर्वसंध्येला शिंदे गटातील बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, आमदर संजय गायकवाड यांनी या सभेवर टीका केली आहे. राज्यात व बुलढण्यात सुद्धा शिवसेना व शिंदे गट यांच्यात अनेक ठिकाणी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या सभेकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST