महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

उद्धव सरकार भ्रष्ट, नवी मुंबईचे लचके तोडले, गणेश नाईकांची घणाघाती टीका - गणेश नाईक उद्धव ठाकरे टीका

By

Published : Oct 5, 2022, 6:24 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील आघाडी सरकार हे भ्रष्ट सरकार Uddhav govt was corrupt होते. गेल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात राज्यासह नवी मुंबई महानगर पालिकेत मोठा घोटाळा BMC Fraud In Uddhav Thackeray Govt झाला असल्याचा घणाघाती आरोप भाजपा आमदार आणि पूर्वाश्रमीचे शिवसैनिक गणेश नाईक यांनी Ganesh Naik on Uddhav Thackeray केला आहे. ठाकरे सरकारच्या कार्यकाळात नवी मुंबई महापालिकेला बाप नव्हता. आता अधिकाऱ्यांची मनमानी सहन केली जाणार नाही. सिडको CIDCO plot scam भूखंड विकून पैसे कमावणारी संस्था आहे. सिडकोचे काम संपले आहे. त्यांनी आपला गाशा गुंडाळावा. नवी मुंबई, ठाणे रायगड रत्नागिरीतील व्हाईट कॉलर दलालांनी शहरातील मोक्याचे भूखंड विकत, शहराचे लचके तोडत बाजार मांडला आहे अशा परखड भाषेत नाईक यांनी आघाडी सरकार, सिडको, एमआयडीसीचा समाचार घेतला. नवी मुंबई महापालिकेने प्रारूप विकास आराखड्याबाबत वार्डनिहाय प्रबोधन करावे, तसेच नागरिकांच्या हरकती सूचना विचारात घेऊन शहराचा प्रारूप आराखडा पुन्हा सादर करावा. नागरिकांना समजेल अशा सहज आणि सोप्या भाषेत म्हणजे मराठी भाषेतच आराखडा असावा या मागण्यांसाठी नवी मुंबई महानगरपालिका माजी विरोधी पक्ष नेते दशरथ भगत यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. त्या प्रसंगी उपोषण स्थळी आले असता नाईक बोलत होते. या प्रकरणी आपण स्वतः नगरविकास मंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे देखील नाईक म्हणाले. महापालिकेने नागरिकांना विचारात न घेता प्रारूप विकास आराखडा इंग्रजी भाषेत सादर केला होता. त्याविरोधात भगत यांनी गेल्या काही दिवसांपासून जागर जनजागृतीचा ही मोहिम राबवली होती. एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाने या मोहिमेचा समारोप झाला. यावेळी अकरा हजारांच्यावर नवी मुंबईकरांनी शहराच्या विकास आराखड्याबाबत आपल्या सूचना आणि हरकती भगत यांच्याकडे सुपूर्द केल्या. या हरकती आणि सूचनांच्या प्रतीसह दशरथ भगत यांची तुला करण्यात आली. आयुक्तांतर्फे नवी मुंबई महानगर पालिका नगर रचना विभागाचे सहाय्यक नगर रचनाकार व संचालक, सोमनाथ केकांत यांनी उपोषण स्थळी भेट देत भगत यांच्याकडून निवेदन स्विकारले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details