कुठल्याही विषयाचं घोंगडं भिजत ठेवलं तर वास मारतोच; जरांगेंच्या आंदोलनावरून उदयनराजेंची प्रतिक्रिया - Maratha Reservation
Published : Jan 11, 2024, 9:12 PM IST
पुणे Maratha Reservation : मराठा आरक्षण देण्यास जास्त दिवस लागत असल्यानं उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी सरकारवर टीका केली. "कुठल्याही विषयाचं घोंगडं भिजत ठेवलं, तर त्याचा वास मारणारच'', असं म्हणत उदयनराजे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या 20 तारखेच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील हे 20 तारखेला आंदोलनासाठी मुंबईत येण्यावर ठाम आहेत. या विषयावर उदयनराजे बोलत होते.
मी जात-पात मानत नाही : राज्यात मराठा आरक्षण देणं शक्य आहे. कुठल्याही इतर राज्याप्रमाणे जर नियम केला तर मराठा आरक्षण देणं सहज शक्य आहे. 72 टक्क्यावर आरक्षण देता येतं आणि मी काही जात-पात मानत नाही. परंतु, मराठा आरक्षण देणं शक्य असल्याची प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी (11 जानेवारी) पुण्यात दिली. सांगली, सातारा, पश्चिम महाराष्ट्र या भागाची विभागीय बैठक गुरुवारी पुण्यात आयोजित करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही बैठक आयोजित केली होती. या बैठकीला उदयनराजे भोसले आले होते.