Tractor crushed kid: ट्रॅक्टरच्या अपघातात 2 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, घटना सीसीटीव्हीत कैद - ट्रॅक्टरने चिरडल्याने निष्पापाचा मृत्यू झाला
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ईशान्य दिल्लीतील भजनपुरा भागात ट्रॅक्टरने चिरडल्याने एका 2 वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ट्रॅक्टर चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. ही संपूर्ण घटना तिथे लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. दरम्यान, ईशान्य दिल्लीचे डीसीपी डॉ. जॉय तिर्की यांनी सांगितले की, दुपारी सुभाष नगर येथे राहणारा एक व्यक्ती आपल्या मुलाला स्कूटीवर घेऊन जात होता. मोठी मुलगी स्कुटीच्या मागे बसली होती. तर, 2 वर्षाचा मुलगा स्कूटीच्या सीटसमोर उभा होता. यादरम्यान भजनपुरा येथील मुख्य दिल्ली दरबार रोडवर ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत असताना स्कूटी स्लीप होऊन मुलगा ट्रॅक्टरखाली आला. गंभीर अवस्थेत मुलाला जवळच्या पंचशील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले.