महाराष्ट्र

maharashtra

Chhatrapati Sambhijiraje

ETV Bharat / videos

Chhatrapati Sambhajiraje : 2024 च्या विधानसभा निवडणुकीत स्वराज्य पक्ष संपूर्ण महाराष्ट्रात उमेदवार उभे करणार - छत्रपती संभाजीराजे - छत्रपती संभाजीराजे 2024 निवडणूक

By

Published : Apr 30, 2023, 7:50 PM IST

बीड : 2024 च्या विधानसभा निवडणुकीत स्वराज्य पक्ष संपूर्ण महाराष्ट्रात उमेदवार उभे करणार, असे माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटले आहे. ते आज बीडच्या परळी येथे अ‍ॅड. माधव आप्पा जाधव मित्र मंडळ संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आले होते. त्यावेळी त्यांची परळी शहरात भव्य रॅली काढत जाहीर सभेला संबोधित केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात, स्वराज्यात कुठेही दहशत नव्हती. परळीतील दहशत ऐकून मला देखील धक्का बसला. महाराष्ट्रातील राजकारणात दररोज नवनवीन घडामोडी, दावे, आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत स्वराज्य पक्ष संपूर्ण महाराष्ट्रात उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. बीडच्या परळी शहरात आयोजित जाहीर सभेत त्यांनी ही घोषणा केली आहे. विशेष म्हणजे बीडच्या परळीमध्ये खाजगी सावकारीमुळे प्रत्येक वर्षात 15 ते 20 लोकांचे बळी जातात. महाराष्ट्राच्या परळीत एवढी दहशत कशी? असा सवाल देखील छत्रपती संभाजीराजे यांनी उपस्थित केला. तसेच परळीमधील दहशत संपवायची असेल तर स्वराज्य पार्टीत या असे आवाहन देखील छत्रपती संभाजीराजे यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details