Maharashtra Politics : ठाकरे गटाचे दोन खासदार, आठ आमदार लवकरच शिवसेनेत; 'या' खासदाराचा गौप्यस्फोट - ठाकरे गटाचे दोन खासदार आणि आठ आमदार शिवसेनेत
बुलडाणा : जिल्ह्यातील शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव (MP Prataprao Jadhav) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. येणाऱ्या काळात ठाकरे गटाचे दोन खासदार तसेच आठ आमदार शिवसेनेत प्रवेश करणार (MPs and MLAs Thackeray group will join Shiv Sena) असल्याचा दावा जाधव यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाचे दोन खासदार आणि आठ आमदार आमच्या संपर्कात असून ते लवकरच शिंदे गटात सामील होतील, असे खासदार प्रतापराव जाधव यांनी म्हटले आहे. ठाकरे गटात पुन्हा भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेनेत प्रवेश करणारे दोन खासदार तसेच आठ आमदार कोण आहेत? याचा खुलासा खासदार प्रतापराव जाधव यांनी करण्याचे जाणीवपूर्वक टाळले आहे. मात्र, खासदार प्रतापराव जाधव यांच्या या गौप्यस्फोटानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.