Training of NDRF at Jalna : जालन्यामध्ये एनडीआरएफचे आपत्ती व्यवस्थापन विभागाला दोन दिवसांचे प्रशिक्षण - कमीत कमी जीवितहानी होईल याचे प्रशिक्षण
जालना : आपत्तीच्या काळात जिल्ह्यात बचाव करण्यासाठी एनडीआरएफ पुणे यांच्यामार्फत आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत दोन दिवसीय प्रशिक्षण व रंगित तालिम आयोजित करण्यात आली. यावेळी आपत्तीच्यावेळी शासनाचे विविध विभाग एक-दुसऱ्याशी कसे समन्वय साधतील व सामान्य जनतेला आपत्तीच्या काळात मदत होईल व कमीत कमी जीवितहानी होईल याचे प्रशिक्षण दिले. कमीत कमी साधनांमध्ये कशी मदत होईल व रोजच्या वापरातील वस्तूंचा वापर करून आपला जीव कसा वाचवता येईल, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, थर्माकोल, घरातील पाण्याच्या घागरी अशा वस्तूंचा वापर करून पाण्यावर कसे तरंगता येते व पूरपरिस्थितीत किंवा आपत्तीच्या काळात आपला जीव वाचेल याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. बुडत असलेल्या व्यक्तीला पाण्यातून कसे बाहेर काढायचे दोरीच्या साहाय्याने कशी मदत करायची त्याचा व आपला जीव कसा वाचवता येईल याचे प्रशिक्षण दाखविले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके एनडीआरएफ युनिट पाचचे निरीक्षक महिंद्र पुनिया अधिकारी तहसीलदार पोलिस अधिकारी आरोग्य अधिकारी विद्युत वितरण कर्मचारी कर्मचारी होमगार्ड अग्निशामकचे कर्मचारी आपत्तीच्या व्यवस्थापन विभागाचे अधिकारी यांची उपस्थिती होती. जालन्यातील मोती तलाव येथे प्रात्यक्षिक घेण्यात आले. एनडीआरएफकडून बचावांतर्गत विविध साहित्य उपयोग करून शोध व बचावाबाबत रंगीत तालीमदेखील घेण्यात आली. एनडीआरएफ युनिट पाचचे वीस ते बावीस अधिकाऱ्यांनी हे प्रशिक्षण दिल्याचा आढावा घेतला ई-टीव्ही भारतने घेतला आहे.