Children Rescued In Mumbai Sea: समुद्रात बुडणाऱ्या दोन मुलांची मुंबई पोलिसांनी केली सुखरूप सुटका
मुंबई: कधी कधी अचानक झालेल्या अपघातात पीडित व्यक्तीला मदत करून त्याचा जीव कसा वाचवायचा हे समजत नाही. पण योग्य वेळी योग्य पाऊल उचलले तर जीव वाचू शकतो. याचे ताजे उदाहरण मुंबई पोलिसांच्या एका हवालदाराने दिले आहे. या धाडसी हवालदाराने जीव धोक्यात घालून समुद्रात बुडणाऱ्या दोन मुलांना वाचवले. मुंबईत मुसळधार पावसामुळे संपूर्ण शहरात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनांच्या वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. अंधेरी सबवे येथे पाणी साचल्याने पुढील सूचना मिळेपर्यंत भुयारी मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे वाहतूक स्वामी विवेकानंद रोडकडे वळवण्यात आली आहे. अतिवृष्टीचा प्रभाव फक्त अंधेरीपुरता मर्यादित नाही. साकी नाका सिग्नल ते जरीमरीपर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. व्हिडीओमध्ये सर्वत्र पाणीच पाणी असून हवालदार विष्णू भाऊराव बेले समुद्राच्या मधोमध दोन मुलांना पकडून समोर आणत असल्याचे चित्र दिसत आहे. पाण्याच्या लाटा पाहता हवालदारांनी योग्य वेळी मुलांना वाचवले नाही, तर मोठी दुर्घटना घडू शकते, असा अंदाज बांधता येतो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हवालदार विष्णू भाऊराव बेळे यांच्या शौर्याची सर्वत्र चर्चा होत असून लोक त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत.