महाराष्ट्र

maharashtra

महागड्या कारने आले आणि झाडे चोरून नेले; व्हिडीओ व्हायरल

ETV Bharat / videos

Nagpur News: महागड्या कारने आले आणि झाडे चोरून नेले; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दोघांना अटक - झाडे चोरून नेत असल्याचा व्हिडीओ

By

Published : Mar 17, 2023, 1:37 PM IST

नागपूर :नागपूर शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जी-20 च्या निमित्ताने शहरात सौंदर्यकरणाचे अनेक कामे केली जात आहेत. त्यासाठी आणण्यात आलेली झाडे चोरीला जात असल्याचे प्रकार घडत आहेत. अश्याच एका चोरीच्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात महागड्या कारने आलेले दोन तरुण काही झाडे चोरून ते कारमध्ये भरून नेताना दिसत आहेत. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सीसीटीव्हीच्या मदतीने दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे. दोन महिन्यांपासून शहरात सौंदर्यकरणाचे कामे सुरू आहे. जी- 20 च्या सदस्यांचे आगमन होईपर्यंत नागपूर शहर सजविण्याच्या आवाहन प्रशासनासमोर आहे. आयोजनाच्या माध्यमातून नागपूरचा चेहरा मोहरा बदलला जातो आहे. जागोजागी वृक्षारोपण, लायटिंग आणि इतर कामे केली जाते आहे. त्यांतच दोन चोरट्यांनी सौंदर्यकरणासाठी आणलेले झाडे चोरून नेत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी यासंदर्भात तात्काळ कारवाई करत आरोपींना ताब्यात घेऊन कार जप्त केली आहे. येत्या 21 आणि 22 मार्च रोजी होणाऱ्या जी- 20 गटाच्या बैठकीचे उपराजधानी संत्रानगरीत आयोजन करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details