Ashadhi Wari 2023 : तुकोबांची आधुनिक पालखीचे आज देहूतून प्रस्थान, पालखी कधी कुठे राहील मिळणार माहिती - पंढरपूर वारी
पुणे : जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा काही तासांवर येऊन ठेपला आहे. त्यापूर्वी देहू देवस्थानकडून जय्यत तयारी सुरू आहे. पालखी रथाला सर्व बाजूने 8 ते 9 सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत पालखी रथाला जीपीएस सिस्टम देखील बसवण्यात आली आहे. याद्वारे पालखी कुठे आहे, हे आता घरबसल्या कळणार आहे. तसेच फेसबुक लाईव्हद्वारे घर बसल्या थेट तुकोबांच्या पालखीचे दर्शन होणार आहे.
आषाढी वारी सोहळा दिवसेंदिवस हायटेक होत चालला आहे. याचाच एक भाग म्हणून आता पालखी रथाला आता जीपीएस प्रणाली जोडण्यात आलेली आहे. यामुळे गुगल मॅपद्वारे रथाचे लोकेशन कळणार आहे. सोबतच नऊ सीसीटीव्ही द्वारे फेसबुक लाईव्ह करून, घरबसल्या दर्शन ही घेता येणार आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा काही तासांवर येऊन ठेपला आहे. शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास पालखी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. राज्यातील कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी देहूत दाखल होत असतात. यावर्षी देखील मोठ्या संख्येने वारकरी देहूत दाखल होणार आहेत. वारकऱयांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रत्येक बारीक गोष्टीवरती देवस्थानकडून लक्ष ठेवण्यात आले आहे. ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजरात वारकरी देहूमध्ये दाखल होत आहेत.
हेही वाचा -