Tiger On Murza Pardi Road : लाखांदूर तालुक्यातील मुर्झा पार्डी रस्त्यावर वाघाचे दर्शन - वाघांना पाहण्यासाठी पर्यटक
भंडारा : हजारो रुपये खर्च करून व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघांना पाहण्यासाठी पर्यटक जातात. प्रत्येक वेळीच त्यांना वाघाचे दर्शन होतेच असे नाही. मात्र लाखांदूर तालुक्यातील जंगल शिवारातील एका रस्त्यावर भर दिवसा पट्टेदार वाघ पाहण्याचा योग लाखांदूरकरांना मिळाला आहे. मोठ्या ऐटीत चालतांनाचा वाघाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा प्रकार लाखांदूर तालुक्यातील मुर्झा पार्डी मार्गावरील मालदा फाट्याजवळ घडला. काही नागरिक मालदा येथे चार चाकी वाहनाने जात होते. त्यावेळी जंगल शिवारातील रस्त्यावरून चक्क वाघाने दमदार एंट्री केली. लोकांना न घाबरता हा वाघ चार चाकी वाहनाच्या समोर अगदी ऐटीत चालत होता. या प्रवाशांनी वाघाचा ऐटीत चालणारा थाट स्वतःच्या मोबाईल मध्ये कैद केला आहे. हा व्हायरल व्हिडिओ असल्याने ईटीव्ही भारत याची नेमकी पुष्टी करत नाही.