देशभरात रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळा साजरा करण्याची तयारी सुरू; घाऊक संघटनेकडून 14 हजार लाडूंचे होणार वाटप - wholesale organization
Published : Jan 19, 2024, 12:18 PM IST
नाशिक : 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळा होत असून देशभरातील प्रत्येक शहरात विविध संस्था संघटना हा उत्सव साजरा करण्याची तयारी करत आहे. नाशिक मधील धान्य किराणा घाऊक व्यापारी संघटना आणि नववर्ष स्वागत समितीकडून मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या रविवार कारंजा भागात शुद्ध देशी तुपामध्ये बनवलेले 14 हजार लाडू वाटप करून हा उत्सव साजरा करणार आहेत. त्या अनुषंगाने तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून लाडू बनवण्यासाठी 150 किलो चणाडाळ, तितकेच स्तूप, 200 किलो साखर आणि 20 किलो काजू बदाम याचा वापर करण्यात येत आहे. नाशिक धान्य किराणा व्यापारी संघटनेचे 300 सदस्य असून संघटनेने त्यांना साखर,चणाडाळ, तूप सुकामेवा देण्यासाठी आवाहन केले होते, त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. 19 जानेवारीपासून प्रत्यक्षात लाडू बनवायला सुरुवात झाली आहे. 22 जानेवारीला रविवार कारंजा येथे नववर्ष स्वागत समिती आणि नाशिक धान्य किराणा गावक व्यापारी संघटना एकत्रित रामाचे मूर्तीचे पूजन करणार आहे. त्यानंतर लाडू वाटप करून आनंद उत्सव साजरा करणार आहे.