Video पुण्यात बर्निंग कारचा थरार, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ - पुण्यात बर्निंग कार
पुणे: काल रात्री पुण्यातील येरवडा येथील गोल्फ क्लब रस्ता औद्योगिक शाळेसमोर एका चारचाकी वाहनाला आग लागल्याची घटना घडली. vehicle caught fire in yerawada. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. येरवडा येथे काल रात्री 9 वाजताच्या सुमारास ही आग लागली होती. यावेळी अग्निशामक दलातील जवानांनी होजरीलच्या साह्याने पाण्याचा मारा करत आग पुर्ण विझवली. हे वाहन टाटा कंपनीच्या नेक्सॉन या मॉडलचे होते. वाहनाने पेट घेतला होता त्यावेळी वाहनामध्ये पाच व्यक्ती प्रवास करत होते. आगीचे नेमके कारण मात्र अद्याप समजू शकले नाही. या कामगिरीत येरवडा अग्निशमन केंद्र अधिकारी सुभाष जाधव, वाहनचालक सुनिल धुमाळ, फायरमन उत्तम खांडेभराड, सुनिल खराबी व मदतनीस अक्षय तरटे, अक्षय पवार यांनी सहभाग घेतला होता.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST