महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Heavy Rains In Gadchiroli : गडचिरोलीमध्ये अतिमुसळधार पाऊस; पर्लकोटा नदीला पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला - भामरागड तालुक्यात 50 मिलिमीटर पावसाची नोंद

🎬 Watch Now: Feature Video

पर्लकोटा नदीच्या पुलावर चार फुट पाणी

By

Published : Jul 18, 2023, 5:00 PM IST

गडचिरोली :जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस सुरू असल्याने, भामरागड लगतच्या पर्लकोटा नदीला पूर आला आहे. पर्लकोटा नदीला पूर आल्याने भामरागड तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच पुराचे पाणी भामरागड शहरात शिरण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तालुका प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या 24 तासात भामरागड तालुक्यात 50 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून एनडीआरएफचे पथक तसेच पोलीस जवान पुराच्या स्थळी तैनात करण्यात आले आहे. तर काल रात्रीपासून पाऊस सुरूच असल्याने, आलापल्ली ते भामरागड दरम्यानची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्याचबरोबर पूर परिस्थिती दरम्यान आरोग्याची समस्या उद्भवू नये यासाठी, तहसीलदार प्रकाश पुपलवार यांनी पुर परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details