Ganeshotsav 2022 पुण्यातील अष्टविनायक गणपती मंडळांचा असा असणार यंदाचा गणेशोत्सव - Ganeshotsav
पुणे गेली दोन वर्षे कोवीडच्या परिस्थितीत अत्यंत साधेपणाने पुणे शहरातील सर्वच गणेशोत्सव Ganeshotsav मंडळांनी Ashtavinayak Ganapati Mandal गणेशोत्सव साजरा केला. पण यंदाच्या वर्षी नेहमीच्या उत्साहात परंपरेप्रमाणे गणेशोत्सव साजरा होत आहे. त्यानुसार पुण्यातील मंडळे देखील तयारीला लागली आहेत. पुण्याचे अष्टविनायक म्हणजेच मानाचा पहिला कसबा गणपती मंडळ, मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी मंडळ, मानाचा तिसरा गुरुजी तालीम मंडळ, मानाचा चौथा महागणपती तुळशीबाग गणपती मंडळ, मानाचा पाचवा केसरी वाडा गणेशोत्सव मंडळ, श्रीमंत भाऊ रंगारी गणेशोत्सव मंडळ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ आणि अखिल मंडई मंडळ या पुण्यातील अष्टविनायक गणेशोस्तव मंडळांचा यंदाचा गणेशोत्सव हा सांस्कृतिक पद्धतीने साजरा होणार आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST