महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Kolhapur Bus Station: बसस्थानाकाच्या छताला गळती; प्रवाशांना छत्री उघडून बसायची वेळ - Rain in Kolhapur

By

Published : Jul 26, 2022, 5:36 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

कोल्हापूर - कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रेल्वे स्टेशन समोरील बस स्थानकाची अतिशय दुरावस्था झाली आहे. छताला गळती लागल्याने पावसाळ्यात अक्षरशः पाण्याच्या धारा लागत आहेत. त्यामुळे प्रवाशांना बस स्थानकातच छत्री उघडून बसण्याची वेळ आली आहे. प्रवाशांनाच काय तर इथल्या केबिनमध्येसुद्धा हीच परिस्थिती आहे. वारंवार याबाबत तक्रार केली आहे. मात्र, एसटी महामंडळाकडून दुर्लक्ष केले जात आहे. व्हिडिओमध्ये दिसत असलेली परिस्थिती पाहून तरी प्रशासनाला जाग येणार का? हेच पाहावे लागणार आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details