Video मंदिरात अस्वलाने वाजवली घंटा,पहा व्हिडिओ - अस्वलाने वाजवली घंटा
आंध्र प्रदेश सत्यसाई जिल्ह्यातील रोला मंडलातील जिरीगेपल्ली गावातील एका मंदिरात अस्वलाने घंटा वाजवल्याचे दृश्य व्हायरल होत आहे. रात्री नऊच्या सुमारास दोन अस्वल मुख्य दरवाजातून मंदिरात आले. त्यात एका अस्वलाने मंदिराच्या घंटाच्या तोंडाला लटकलेली दोरी पुढच्या पायांनी ओढली आणि घंटा वाजवली. ही दृश्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. हे पाहून स्थानिक लोक आश्चर्यचकित झाले आहेत. मंदिराच्या पुजार्यांचे म्हणणे आहे की, अस्वल वारंवार येत असतात.आतापर्यंत त्यांनी कोणाला इजा केलेली नाही. The Bear That Rang The Bell In The Temple
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST