महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Upper Wardha Dam : अप्पर वर्धा धरणावरील आकर्षक विद्युत रोषणाईने घेतले पर्यटकांचे लक्ष वेधुन - Chikhaldara

By

Published : Jul 25, 2022, 7:42 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

अमरावती जिल्ह्यातील (Amravati District) वर्धा नदीच्या उगम क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने अप्पर वर्धा (Upper Wardha Dam) धरणाच्या जलसाठयात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सलग तिसऱ्या दिवशी अप्पर वर्धा धरणाचे १३ दरवाजे उघडले आहेत. ज्या ठिकाणाहून पाण्याचा विसर्ग होतो, त्याठिकाणी आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. रंगीबेरंगी प्रकाश व्यवस्थेमुळे पाण्याचे विविध रंगातील रूप पाहतांना पर्यटक भारावून जात आहेत. गेल्या ३ दिवसांपासून अप्पर वर्धाच्या १३ दरवाज्यांमधुन सातत्याने पाण्याचा विसर्ग केला जातोय. सध्या धरणात ८१ टक्के जलसाठा आहे. जलसाठा वाढत असल्यामुळे धरणाचे १३ दरवाजे १०० सेमी ने उघडण्यात आलेत. १६४३ क्यूसेक ने पाण्याचा विसर्ग केला जातोय. अप्पर वर्धा धरणाच्या दरवाजांवर रात्रीच्या वेळी लाइटिंग लावण्यात येते, ही आकर्षक रोषणाई डोळ्याचे पारणे फेडत आहे. शनिवार आणि रविवारी असे दोन दिवस सुटी लागून आल्याने,काही पर्यटकांनी निर्सगाचा आनंद लुटण्यासाठी विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदऱ्याकडे (Chikhaldara) आपली पावले वळवलीत .
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details