Durga Visarjan: मुख्यमंत्री दर्शनाला न आल्याने ठाण्यातील विटावा परिसरातील देवीचे विसर्जन थांबवले - CM eknath shinde
Durga Visarjan ठाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde हे अनेक ठिकाणी नवरात्री उत्सवानिमित्त मंडळांना भेटी देत होते. अशाच प्रकारे ठाण्यात देखील विटावा परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांना नवरात्रीनिमित्त दर्शनाचे आमंत्रण देण्यात आले होते. परंतु मुख्यमंत्री हे दर्शनाला न आल्याने चक्क देवीचे विसर्जनच मंडळांने थांबवलेले आहे. विटावा परिसरातील नवदुर्गा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून नवरात्र उत्सव आयोजित करण्यात आला होता. परंतु या नवरात्र उत्सवासाठी मुख्यमंत्री दर्शनाला येतील अशी आशा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दसरा मेळावा तसेच अन्य नवरात्री उत्सवांना भेट देण्यामध्ये व्यस्त असल्याने विटावा येथील नवरात्री उत्सवाला जाऊ शकले नाही. म्हणून विटावा येथील नवरात्र उत्सव मंडळाने देवीचे विसर्जन केले नाही. जोपर्यंत मुख्यमंत्री या देवीच्या दर्शनाला येत नाहीत तोपर्यंत विसर्जन करणार नाही चक्क असा इशारा शिंदे गटातील शाखाप्रमुख तानाजी कोळेकर यांनी दिला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST