Thane Husband Wife Viral Video : भर रस्त्यात नवरा बायकोची हाणामारी, व्हिडिओ व्हायरल - तीन हात नाका परिसर
Published : Sep 20, 2023, 2:28 PM IST
ठाणे Thane Husband Wife Viral Video : ठाण्यात घरातल्या किरकोळ भांडणावरून भर रस्त्यात हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालंय. ( Thane Husband and wife fight on the road ) ठाण्यातल्या तीन हात नाका परिसरात एका नवरा बायकोचं भांडण इतकं वाढलं की, त्याचं रुपांतर हाणामारीत झालं. (Husband and wife fight on the road ) इतकचं नव्हे तर या नवरा बायकोने रस्त्यावर मिळालेल्या दगडांनी एकमेकांवर हल्ला करत भर रस्त्यात मोठी शिवीगाळ सुरू होती. या प्रकारात दोघांनाही दगड लागल्यानंतर स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. दोघांनाही समजूत घालत विनंती केली. मात्र, दोघेही एकमेकांना शिव्या देत असल्यामुळे अखेर या परिसरात तैनात असलेल्या पोलिसांना मध्यस्थी करून दोघांना समजावून घरी पाठवाव लागलं. भर रस्त्यात सुरू असलेल्या या जोरदार भांडणामुळे याठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. यातील काही नागरिकांनी पुढाकार घेत, या दोघांचं भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला, दोघांना समजावले. मात्र, हा वाद काही केल्या शांत होत नसल्यामुळे अखेर पोलिसांना याठिकाणी बोलवण्यात आलं. ( Thane Husband Wife Viral Video )