Thackeray vs Shinde Group : उद्धव ठाकरे गटाच्या गर्भवती महिला कार्यकर्त्याला शिंदे गटाकडून मारहाण, आयसीयुमध्ये उपचार सुरू
ठाणे : ठाकरे गटाच्या एका महिला कार्यकर्त्याने शिंदे गटाविरोधात पोस्ट केली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाच्या गर्भवती महिला कार्यकर्त्याला शिंदे गटाकडून मारहाण केली. त्यामुळे त्या महिलेवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आज दुपारी 1 वाजता रश्मी ठाकरे व उद्धव ठाकरे हे त्यांची भेट घेणार आहेत.
महिला कार्यकर्त्यावर हल्ला -मागील काही दिवसांपासून शिंदे गटातील कार्यकर्त्यांकडून विरोधकांना शांत बसवण्यासाठी किंवा त्यांनी केलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी मारहाण केली जात आहे. या संदर्भामधले अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. कासारवडवली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यावर हल्ला झाला. ठाण्यात कायदा सुव्यवस्था आहे का, असा प्रश्न आता ठाकरे गटाचे कार्यकर्ते विचारू लागले आहेत. याबाबत ठाकरे गटातील नेत्यांनी दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांना आवाहन केले आहे. जवळपास 20 महिलांनी रोशनी शिंदे या युवती सेनेच्या कार्यकर्तेला ऑफिसवरून घरी जाताना ऑफिसमध्ये घुसून मारहाण केली आहे. पोलिसांनी आम्ही चौकशी करून माहिती घेत असल्याचे सांगितले आहे.
राजकीय वातावरण तापले -ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी देखील यावर मिळालेल्या खुर्च्यांचा जनतेला त्रास देण्यासाठी वापर होत असल्याची टीका शिंदे फडणवीस सरकारवर केली आहे. मी पोलिस स्टेशनमध्ये दोनदा चक्कर येवून पडले, तरीही कोणी लक्ष देत नव्हते. राजन विचारे साहेबांनी मला सिव्हिल हॉस्पीटलमध्ये नेले, तेथेही कुणी लक्ष देत नव्हते. मी सतत माझ्या पोटात दुखते, मला उलट्या होत आहेत. तरीही कुणी लक्ष देत नव्हते शेवटी मला खासगी रूग्णालयात भरती केले. यात माझी चूक काय? उद्या मला काही झाले तर याला जबाबदार कोण, असा सवाल रोशनी शिंदे यांनी विचारला आहे.
प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिली माहिती - महिलेच्या शरीरावर कोणताही सक्रिय रक्तस्त्राव आणि अंतर्गत जखम नाही. महिलेला रुग्णालयात दाखल केले आहे. हाडे फ्रॅक्चर नाहीत, शरीराला दुखापत झाली असून त्यावर उपचार केले जात आहेत. सध्या या महिलेची प्रकृती स्थिर आहे. सोनोग्राफीमध्ये अंतर्गत दुखापत झाली नसल्याचे दिसून येत आहे. पुढील वैद्यकीय तपशिलांची प्रतीक्षा आहे, अशी माहिती संपदा हॉस्पिटलचे डॉ उमेश सुदाम आलेगावकर यांनी दिली आहे.
हेही वाचा - कोंबड्या चोरायला आले अन् हत्या करून गेले