TS Secretariat : तेलंगणाच्या नव्या सचिवालयाचे ड्रोन व्हिज्युअल; पाहा व्हिडिओ - Telangana Secretariat
हैदराबादच्या हुसैन सागरजवळ तेलंगणा राज्य सचिवालयाची नवीन इमारत उभारण्यात आली आहे. रुंद लॉनच्या मध्यभागी ही अत्याधुनिक इमारत उभी आहे. इमारतीच्या बांधकामापासून ते फर्निचरपर्यंत सर्व काही एकसमान असेल याची काळजी घेण्यात आली आहे. इमारतीच्या आतील चेंबर्सची सजावट करण्यात आली असून येथील सर्व फर्निचर नवे आहे. ही प्रशासकीय इमारत पांढऱ्या रंगात अत्यंत आकर्षक दिसत आहे. मुख्य इमारतीत मुख्यमंत्री, मंत्री, अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी चेंबर्स आणि वर्क स्टेशनची रचना करण्यात आली आहे. ही इमारत रुंद कॉरिडॉरसह पर्यावरणपूरक पद्धतीने बांधण्यात आली आहे. यासाठी ग्रीन बिल्डिंगच्या नियमांचे पालन केले गेले आहे. संपूर्ण इमारत प्लग अँड प्ले मोडमध्ये तयार करण्यात आली आहे. राज्य सरकारने या खास ड्रोन फुटेजद्वारे या इमारतीला चित्रित केले आहे.