Video: उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव घेऊ शकतात बागेश्वर बाबांची भेट, पाहा खास रिपोर्ट - Tejashwi Yadav
पाटणा (बिहार) : बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव तरेत पाली मठात जाऊन बाबा बागेश्वर यांची भेट घेऊ शकतात. बाबा बागेश्वर फाउंडेशनच्या आयोजकाने त्यांना हनुमंत कथेत येण्याचे निमंत्रण दिले आहे. तेजस्वी यादव यांनी येण्यास होकार दिल्याचे आयोजकांनी सांगितले. मात्र, ते कोणत्या दिवशी येणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, कथाकार पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बाबा बागेश्वर सध्या पाटण्यात आहेत. बाबा रोज नौबतपूरला जाऊन हनुमंत कथा पाठ करतात. मात्र, बिहारमध्ये या कार्यक्रमाला मोठा विरोध होत आहे. दरम्यान, कार्यक्रमाचे आयोजक आज 10 सर्कुलर रोड राबरी निवासस्थानी पोहोचले आणि त्यांनी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. बाबा बागेश्वर फाउंडेशनचे एक प्रतिनिधी पहिल्यांदाच लालूंच्या निवासस्थानी गेले. यापूर्वी लालूंचे मोठे चिरंजीव मंत्री तेज प्रताप यादव यांनी बाबांच्या आगमनापूर्वीच पाटणा विमानतळावर आंदोलन करण्याची धमकी दिली होती. तेव्हापासून पाटण्यात बाबा बागेश्वरआल्यावर राजकारण अधिकच तापले होते.