T20 cricket match : दुसऱ्या टी-20 क्रिकेट सामन्याकरिता भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ नागपुरात दाखल - भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ नागपुरात दाखल
नागपूर - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा टी-20 क्रिकेट सामना (second T20 cricket match) नागपूरच्या जामठा मैदानावर शुक्रवारी खेळला जाणार आहे. त्याकरिता भारतीय आणि ऑस्ट्रेलियन संघ आज नागपूरात दाखल (Team India and Australia arrived in Nagpur) झाले आहेत. दोन्ही संघाच्या स्वागताकरिता हजारो नागपूरकर विमानतळावर (Nagpur International Airport) आले होते. मात्र पोलिसांच्या सुरक्षा बंदोबस्तात दोन्ही संघांना हॉटेलमध्ये सुखरूप पोहोचवण्यात आले आहे. दोन्ही संघांना नागपूरातील वेगवेगळ्या हॉटेलमध्ये थांबवण्यात आले आहे. उद्या सामन्यापूर्वी दोन्ही संघ विदर्भ क्रिकेट असोसिएशन जामठाच्या मैदानावर सराव करणार आहेत. सर्व क्रिकेट प्रेमींचे लक्ष्य 23 सप्टेंबर रोजी होणाऱ्या नागपूरच्या सामन्याकडे लागलेले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST