Golden Tea Cup Parner पारनेरमध्ये चहाप्रेमी सोन्याच्या कपात पितायेत चहा, तब्बल सहा लाख खर्चून भागवली हौस - Tea shop
संध्याकाळ झाली की प्रत्येकाला हवा असतो तो चहा. चहा हा प्रत्येकाचा तसा आवडता. रेंगाळणाऱ्या संध्याकाळी हाच चहा जर खऱ्या खुऱ्या सोन्याच्या कपात Golden Tea Cup तुम्हाला मिळाला तर. होय ही शक्कल सुचलीये अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर Parner in Ahmednagar district येथील स्वप्नील पुजारी याला. स्वप्नील पुजारी याने आपल्या चहाचा दुकानात Tea shop सोन्याच्या कपातून ग्राहकांना चहा देण्याची सुविधा आज पासुन सुरू केली. तब्बल सहा लाख रुपये खर्चून त्यांनी दोन सोन्याचे कप बनविले आहेत. अगदी सर्वसमान्यांना देखील सोन्याच्या कपातून चहा पिण्याची हौस आता भागवता येणार आहे. स्वप्नील पुजारी याची दोन वर्षापासून ईच्छा होती की सर्व सामान्य माणसाला सोन्याच्या कपातून चहा द्यावा त्यांनी ही कल्पना सत्यात उतरवली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST