महाराष्ट्र

maharashtra

व्हिडिओ व्हायरल

ETV Bharat / videos

Sword Attack Viral Video: जमिनीच्या वादातून भावावर तलवारीने हल्ला; व्हिडिओ व्हायरल - Sword attack on brother over land dispute

By

Published : Jul 25, 2023, 9:57 PM IST

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : जमिनीच्या वादातून एका भावाने दुसऱ्या भावावर तलवारीने वार केल्याची धक्कादायक घटना वडगाव कोल्हाटी येथे घडली. ही घटना 20 जुलै रोजी घडली असून त्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर आता व्हायरल झाला आहे. राजेश तुकाराम साळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून चुलत भाऊ आणि पुतणे यांनी जमिनीच्या वादातून त्यांच्यावर आणि भावावर तलवारीने वार केले. सोबतच जीवे मारण्याचाही प्रयत्न केला. त्यावरून मुकेश उर्फ बबलू त्रिंबक साळे, अभिषेक त्रिंबक साळे, ऋषिकेश त्रिंबक साळे, त्रिंबक आसाराम साळे यांच्यावर कलम 606/2023, भादंवि कलम 307, 341, 504, 506, 34 भादंवि सह 4, 25 हत्यार कायदा, 135 मपोका नुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील आरोपी यांना अटक केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली; या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details