Inauguration of Parliament House : संसद भवनाच्या उद्घाटनावरून विरोधकांना सुरेश प्रभूंचे आवाहन - संसद भवन
अहमदनगर : विरोधक अत्यंत चुकीच्या पद्धतीने हा विषय लोकांसमोर मांडत आहेत. राष्ट्रपतींचा सन्मान प्रत्येक व्यक्ती करते आणि म्हणूनच नरेंद्र मोदींना एका महिलेला जी आदिवासी भागातून आलेल्या आहेत. त्यांना देशाच्या सर्वोच्चपदी बसवले आहे. हा विषय राष्ट्रपती यांच्या सन्मानाचा नाही तर हा विषय 75 वर्ष स्वातंत्र्य मिळाल्यापासूनचा आहे. पार्लमेंट भवन देखील ब्रिटिशांनी बांधले होते, त्याचा वापर आपण करतोय. आपण आपल्या हक्काची स्वतःने तयार केलेली आपण आपल्या हक्काची वाटावी अशी इमारत तयार करत आहोत. विरोधकांना मनापासून विनंती करायची आहे. कृपया यात राजकारण न आणता आपल्या समाजाचे पुढचे एक पाऊल पडत आहे. लोकशाही सुदृढ होण्यासाठी आवश्यक असणारी संसद जिथे कायदे केले जातात, त्याच उद्घाटन होत आहे. अशा वेळेला आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करावं, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. ते अहमदनगरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. 28 मे रोजी नव्या संसद भवनाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. विरोधकांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. अशातच सुरेश प्रभू यांनी विरोधकांना आवाहन करत सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला विरोधक काय उतार देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.