महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Marathi Kida Suraj Khatavkar वडापावचा गाडा, शिक्षक ते आता मराठी किडा; सुरज खटावकर याच्याशी खास बातचीत - Marathi Kida Suraj Khatavkar

By

Published : Sep 22, 2022, 9:46 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

कोल्हापूर सोशल मीडिया असे एक माध्यम आहे. ज्याचा चांगला वापर करून आज अनेकजण महाराष्ट्रातच काय तर देशभरात आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करताना पाहायला मिळत आहेत. ( Marathi Kida Suraj Khatavkar ) अशाच सर्वांना एक वेगळी ओळख देण्यामागे युट्युब, फेसबुक, इंस्टाग्राम आदींचा मोठा वाटा आहे. एका अशाच युट्युबरची आपण भेट घेणार आहे, ज्याने संपूर्ण महाराष्ट्रात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. सुरज खटावकर असे याचे नाव असून त्याने सुरू केलेल्या युट्युब चॅनेलमुळे तो संपूर्ण महाराष्ट्रातील अनेकांच्या मोबाईलवर जाऊन पोहोचला आहे. सुरज खटावकर हा आपल्या वडिलांच्या वडापावच्या गाड्यावरतीच त्यांना मदत करायचा. ( Suraj Khatavkar story In kolhapur ) शिक्षणही चांगलं त्यानंतर काही काळ एका सीबीएससी शाळेत शिक्षक म्हणून नोकरी सुद्धा केली. मात्र मुळात बडबडी स्वभावाचा असल्याने आणि अजून काहीतरी करायचे असे मनात असल्याने काही काळाने त्याने ती नोकरी सुद्धा सोडली. त्यानंतर काही काळ घरीच बसून होता. अगदी घरचे सुदधा हा आता वाया गेला इथपर्यंत विचार करू लागले होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details