Watch Video : भाजपाने ९ वर्षांत ९ सरकार...; सुप्रिया सुळेंचा केंद्रावर हल्लाबोल - खासदार सुप्रिया सुळे
नवी दिल्ली : लोकसभेत मोदी सरकारवर अविश्वास प्रस्तावाची चर्चा सुरू आहे. यावेळी बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर खरपूस टीका केली. मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी माझी मागणी असल्याचे त्या म्हणाल्या. मणिपुरात दंगल, खून आणि बलात्काराच्या १०,००० पेक्षा जास्त केसेस समोर आल्या आहेत. आपण इतके असंवेदनशील झालो आहोत का? या सरकारची हीच समस्या आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला. यासोबतच वाढत्या महागाईच्या मुद्यावरूनही त्यांनी सरकारला घेरले. यूपीएच्या काळात ज्या गोष्टी ५०० रुपयांत मिळत होत्या त्या विकत घ्यायला आता १००० रुपयांपेक्षा जास्त किंमत मोजावी लागते, असे त्या म्हणाल्या. तसेच भाजपाने नऊ वर्षांत नऊ राज्य सरकार पाडल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.