महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Swabhimani farmers association मध्यरात्री उसाचा ट्रॅक्टर पेटवला; स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर संशय - मध्यरात्री उसाचा ट्रॅक्टर पेटवला

By

Published : Nov 17, 2022, 1:35 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST

ऊस दराच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने Swabhimani farmers association दिनांक १७ आणि १८ या दोन दिवशी ऊसतोड तसेच ऊस वाहतूक बंद ठेवण्याचे आवाहन Appeal to stop sugarcane transport करत आंदोलनाची हाक दिली Called for agitation आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी मध्यरात्री इंदोली फाटा तालुका कराड येथे अज्ञातांनी जयवंत शुगर कारखान्याकडे ऊस घेऊन निघालेला ट्रॅक्टर पेटवून दिला आहे. आगीत नवा कोरा ट्रॅक्टर जळून खाक New tractor gutted in fire झाला असून या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा हात असल्याचा पोलिसांना संशय आहे. उंब्रज पोलिसांनी ट्रॅक्टर ताब्यात घेऊन उंब्रज पोलीस ठाण्याच्या आवारात उभा केला आहे. याप्रकरणी उंब्रज पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याची कार्यवाही सुरू असून संशयित म्हणून स्वाभिमानीचे जिल्हा उपाध्यक्ष दादासो यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details