महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Midterm Election जनतेचा सूड उगवण्यासाठी मध्यावधी निवडणुका घ्यायच्या का, मुनगंटीवारांचा सवाल - Midterm Election

By

Published : Nov 5, 2022, 10:57 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

Midterm Election नांदेड जनतेचा सूड उगवण्यासाठी मध्यावधी निवडणूक घ्यायच्यात का असा सवाल मंत्री मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे. उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या बैठकीत कार्यकर्त्यांना मध्यावधी निवडणुकीसाठी तयार राहण्याचे आदेश दिल्याचे वृत्त आहे. त्यावर नांदेडमध्ये असणाऱ्या मंत्री सुधीर मुनगंटीवार Minister Sudhir Mungantiwar यांनी जोरदारपणे टीका केली आहे. निवडणुका घेण्याचा अधिकार यांनी कुणी दिला असा सवाल ही मुनगंटीवार यांनी उपस्थित केला आहे. अंधेरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत अवघे 31 टक्के मतदान झालेल्या या राजकीय पक्षांनी दाखवलेल्या अनुकम्पावर जनतेत नाराजी आहे. त्यातून अवघे 31 टक्के मतदान झाल्याने नोटाला कितपत मते मिळतील. त्यावर सगळे गणित अवलंबून असल्याचे मंत्री मुंगणटीवार म्हणाले आहेत. सध्या राज्यात राजकीय धुसफूस सुरू आहे, पण ही धुसफूस भांडणात बदलली तर मध्यावधी निवडणूका लागतील, अशी परिस्थिती असल्याची प्रतिक्रिया वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar leader of Vanchit Aghadi यांनी दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्या मध्यावधी निवडणुकीवर केलेल्या वक्तव्यावर आंबेडकर बोलत होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details