Student serving teacher video goes viral: शाळेत शिक्षिकेची सेवा करणाऱ्या विद्यार्थ्याचा व्हिडिओ व्हायरल
हरदोई : जिल्ह्यातील एका इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळेतील शिक्षिका विद्यार्थिनीकडून हात दाबून सेवा करून घेत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे (Student serving teacher video goes viral). या व्हिडिओची दखल घेत जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षिकेला निलंबित केले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ हरदोई येथील पोखरी इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूलचा आहे. व्हिडिओमध्ये, एक शिक्षिका उर्मिला सिंग वर्गात खुर्चीवर बसून विद्यार्थिनीकडून हात रगडून घेताना दिसत आहे. यावेळी शिक्षिका बाटलीतून थंड पाणी पीत हसत आहे आणि खुर्चीवर आरामात बसलेली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये वर्ग खोलीची अवस्थाही दिसून येत आहे. ज्यामध्ये सर्व विद्यार्थी वर्गात फिरताना दिसतात. व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांमध्ये होत असलेल्या शिक्षणासोबतच शिक्षण व्यवस्थेसह शिक्षकांचेही वास्तव समोर आले आहे. व्हायरल व्हिडिओ निदर्शनास येताच शिक्षिकावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी बी.पी.सिंह यांनी सांगितले. याप्रकरणी गटशिक्षणाधिकार्यांकडून चौकशी करून शिक्षकावर विभागीय कारवाईही केली जाणार आहे. हेही वाचा - Arpita Mukherjee : अबब..! अर्पिता मुखर्जीच्या दुसऱ्या घरात सापडले 28 कोटींचे घबाड, पैसे भरायला लागले 10 ट्रंक
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST