महाराष्ट्र

maharashtra

भटक्या कुत्र्यांचा पोस्टमनवर हल्ला

ETV Bharat / videos

Stray Dog Attack Video : भटक्या कुत्र्यांचा हैदोस; पोस्टमनवर जीवघेणा हल्ला - पोस्टमनवर केला जीवघेणा हल्ला

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 8, 2023, 10:31 PM IST

मुंबई : Stray Dog Attack Video : शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढत चालली आहे. घरातून बाहेर पडल्यानंतर कोणत्या रस्त्यावर भटके कुत्रे लोकांवर भुंकतील आणि त्यांना चावतील याचा अंदाज कोणीही बांधू शकत नाही. मुंबईच्या पवई परिसरात व्हीनस बिल्डिंगजवळ पत्र देण्यासाठी पोहोचलेल्या पोस्टमनवर अशा 5 भटक्या कुत्र्यांनी एकामागोमाग एक हल्ला (Dog Attack News) केलाय. या हल्ल्यात पोस्टमन जखमी (Postman Injured) झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुत्र्यांनी पोस्टमनवर हल्ला (Stray Dog Attacked on Postman) केल्याचा सीसीटीव्ही फुटेज आता व्हायरल (CCTV Footage Viral Video) होत आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, महापालिकेने अशा भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आता नागरिकांकडून होऊ लागली आहे.  

ABOUT THE AUTHOR

...view details