Stone Pelting In Shahada: शहाद्यात दोन गटात दगडफेक; परिस्थिती नियंत्रणात - शहाद्यात दोन गटात दगडफेक
Published : Sep 29, 2023, 10:27 PM IST
नंदुरबारStone Pelting In Shahada: शहादा शहरातील एका चौकात किरकोळ कारणावरून दोन गटात दगडफेक सुरू झाली. या दगडफेकीमुळे शहरातील वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते. (Tense situation in Shahada) घटना घडतात मोठा पोलीस फौजफाटा शहादा शहरात दाखल झाला. (Eid E Milad rally) पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले. (Shahada city)
शहादा शहरातील साळी गली, कुकडेल भागात ईद-ए-मिलादच्या रॅलीमध्ये दोन गटात वाद होऊन धार्मिक तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी हा वाद मिटवला (tension between two groups) होता. दुपारनंतर एक गट अचानक आक्रमक झाला. त्यानंतर दोन्ही गट आमने-सामने आले. यात शहरातील साळी गली, कुकडेल भागात दगडफेकीची घटना घडली आहे. या दगडफेकीत पाच ते सहा वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर पाच ते सहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळी पोलीस वेळीच दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला. तरी शहादा शहरांमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पोलीस दलाच्या वतीने जिल्ह्यात अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.