Bhagwat Geeta Video : मनुष्य कोणत्याही अडचणीत विचलित होत नाही...अशी ती अवस्था, वाचा ,आजची प्रेरणा
समाधीच्या आनंदी अवस्थेत स्थापित झालेला मनुष्य सत्यापासून कधीच विचलित होत नाही. हे सुख प्राप्त झाल्यावर तो याहून मोठा दुसरा लाभ मानत नाही. समाधीची आनंदी अवस्था प्राप्त झाल्यावर मनुष्य कोणत्याही अडचणीतही विचलित होत नाही. निःसंशयपणे भौतिक संपर्कातून उद्भवलेल्या दुःखांपासून हीच खरी मुक्ती आहे. चंचलता आणि अस्थिरतेमुळे मन जिकडे फिरते, तिथून खेचून त्यावर नियंत्रण ठेवावे. योगसाधनेने सिद्धी किंवा समाधी अवस्थेत माणसाचे मन संयमित होते. मग माणूस स्वतःला शुद्ध मनाने पाहू शकतो, स्वतःमध्ये आनंद घेऊ शकतो. आजची प्रेरणा. भागवद गीता.