Snowfall in Himachal : आईसलॅंड नव्हे, हे तर आपलंच हिमालच! पाहा बर्फवृष्टीनंतर निसर्गाचं अद्भुत दृष्य
Published : Nov 10, 2023, 7:53 PM IST
शिमला (हिमाचल प्रदेश) : हिमाचल प्रदेशात या हंगामातील बर्फवृष्टी सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसात राज्यातील लाहौल स्पितीसह उंच डोंगराळ भागात बर्फवृष्टी झाली. बर्फवृष्टीमुळे लाहौल स्पितीच्या टेकड्या पांढऱ्या शुभ्र चादरीनं लपेटलेल्या दिसत आहेत. बर्फवृष्टीमुळे डोंगर, रस्ते, घरं आणि वाहनांवरही बर्फाचा जाड थर पसरलाय. यामुळे लाहौल स्पितीची दरी जणू काही आईसलँडसारखीच दिसते आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही निसर्गाचे हे अनोखे आणि अद्भुत नजारे पाहू शकता. कदाचित ही दृष्य पाहिल्यानंतर तुम्हीही हिमाचलच्या टेकड्यांना भेट देण्यापासून स्वतःला रोखू शकणार नाही. या बर्फवृष्टीमुळे आता राज्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये. त्यामुळे आपत्तीचा फटका बसलेला पर्यटन उद्योग पुन्हा एकदा रुळावर येण्याची अपेक्षा आहे. पाहा हा व्हिडिओ