महाराष्ट्र

maharashtra

कचऱ्याच्या डंपरनं चिरडले बहीण भाऊ

ETV Bharat / videos

कचऱ्याच्या डंपरनं चिरडले बहीण भाऊ; संतप्त जमावाने पेटवला डंपर - Accident in nagpur

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 29, 2023, 3:41 PM IST

नागपूर : नागपूर शहरालगत असलेल्या बिडगाव भागात कचरा वाहून नेणाऱ्या भरधाव डंपरनं बहीण भावाला चिरडल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली आहे. यामध्ये १६ वर्षीय अंजली सैनी बहीण आणि १८ वर्षीय सुमित सैनी या भावाचा जागीच मृत्यू झाला. मुलगी एका इंटरनेट कॅफेत काम करत होती तर भाऊ गॅरेजमध्ये काम करत होता अशी माहिती पुढे आली आहे. बहीण भावाला डंपरने चिरडल्यानंतर संतप्त झालेल्या जमावाने डंपर जाळला आणि इतर गाड्यांच्या काचा ही फोडल्या आहेत. बिडगाव परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर आले आहेत. पोलिसांनी गर्दीला पांगवत तणाव कमी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तसंच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details