Simbhora Dam full पर्यटकांच्या गर्दीने फुलले सिंभोरा, पर्यटक कुटुंबासह लुटत आहेत मनसोक्त आनंद - Amravati Upper Wardha Dam
अपर वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या ५ दिवसापासून पाऊस कोसळत असल्यामुळे; धरणात 2713 दलघमी पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे धरणाचे तेराही दरवाजे आज सकाळी १० वाजता १७० सेंटिमीटरने उघडण्यात आले आहेत. त्यातून तब्बल ३२१९ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. काल सायंकाळी सात वाजेपासून मोर्शी, आष्टी, तळेगाव मार्गाची वाहतूक बंद करण्यात आली. सिंभोरा धरण पुर्णपणे ओव्हरफ्लो (Simbhora Dam full) झाल्याने, धरणाचे तेराही दारे उघडण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यासह (Amravati) नजीकच्या जिल्ह्यातील पर्यटकांची पावले तिकडे वळली आहेत. गेल्या पाच दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यामध्ये पावसाच्या धारा बरसत आहेत. अशातच पावसाचा आनंद लुटण्यासाठी पाण्याचे फवारे आपल्यावर अंगावर घेण्यासाठी, पर्यटकांची पावले सिंभोरा धरणाच्या दिशेने वळली आहेत. पर्यटक कुटुंबासह मनसोक्तपणे आनंद (tourists having a lot of fun with their families) लुटत आहे. पर्यटकांच्या गर्दीने सिंभोरा फुलले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST